देश विदेश

PM मोदींच्या १ हजार २०० कोटीच्या विमानाचा फोटो व्हायरल

नवी दिल्लीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेत तयार झालेल्या विमानाचा पहिला फोटो समोर आला आहे. मोदींच्या सुरक्षेचा विचार करून VVIP Boeing 777-300 ER या विशेष विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या यातील दोन विमान तयार झाली आहेत. या विमानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोग्राफर अॅडी एग्लॉफ यांनी हा फोटो घेतलाय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींसाठी तयार करण्यात आलेल्या या विमानाची डिलिव्हरी या वर्षाच्या अखेरपर्यंत होणार आहे. तर दुसरे विमान ऑगस्टपर्यंत अमेरिकेला दिले जाईल. 

या विमानासाठी भारताने तब्बल १ हजार २०० कोटी रुपये मोजले आहेत. विमानात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टंम्प यांना देण्यात आलेली सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावर एखाद्या क्षेपणास्त्राने जरी हल्ला केला तरी हे विमान सुरक्षित असेल. या विमानाच्या निर्मितीसाठी भारत आणि अमेरिकेत करार झाला आहे

व्हायरल झालेल्या फोटोत विमानाचा रंग पूर्ण पांढरा आहे. त्याच्या मागील बाजूस भारताचा तिरंगा असून पूर्ण विमानावर भगवा, पांढरा आणि हिरवा रंग देण्यात आलाय. तसेच मोठ्या अक्षरात भारत आणि INDIA असे लिहण्यात आले आहे. 

या विमानातून भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती प्रवास करू शकतील. सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडियाच्या बोइंग ७४७ या विमानातून प्रवास करतात. या विमानाचे खास वैशिष्ट म्हणजे ऑफिस स्पेस, मिटिंग रूमसह अनेक सुविधा दिल्या आहेत. तसेच मेडिकल इमर्जंसीसाठी स्वतंत्र विभाग दिलाय. इतक नव्हे तर विमानाने भारतातून उड्डाण केले तर इंधन भरण्यासाठी कुठेही थांबण्याची गरज लागणार नाही. म्हणजेच विनाथांब एका टप्प्यात होईल. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close