क्राईम

आर्थिक व्यवहाराच्या वादातून डॉक्टरनेच घडवून आणला स्फोट!

कंपाउंडर मयत डॉक्टर वर गुन्हा दाखल

गेवराईतालुक्यातील बाग पिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील मेडिकल दुकानात स्फोट झाला होता या दुर्घटनेत डाॅ. सुधाकर चोरमले वय 35 वर्ष यांचा मृत्यू झाला होता. मात्र हा स्फोट डॉक्टरनेच घडवून आणला असल्याचा जवाब या दुर्घटनेत जखमी झालेल्या कंपाउंडर ने दिला आहे.

गेवराईपासून नजीक असलेल्या बाग पिंपळगाव येथे तलवाडा फाट्यावर डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री त्यांच्या शेजारी असलेल्या केमिस्ट दुकानाला लागलेल्या आगीत डाॅ. चोरमले यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व त्यांनी ही आग आटोक्यात आणली होती. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता.
पोलीस तपासात काही गोष्टी याठिकाणी संशयास्पद आढळून आल्या होत्या. डॉक्टर इतक्या रात्री मेडिकलमध्ये कशाला गेले ? हा प्रश्न पोलिसांना पडला होता. तेव्हा त्यांनी जखमी कंपाउंडरकडे या प्रकरणाची चौकशी केली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच कंपाउंडरने घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. मयत डॉक्टर व केमिस्ट चालकांचा देवाण-घेवाणी वरून जुना वाद होता. त्या रागातून डॉक्टरने कम्पाउंडरला रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. डॉक्टरने आधीच दुकानाची एक बनावट चावी बनवून घेतली होती. त्याच चावीने डॉक्टरने मेडिकलचे शटर उघडले व ते आत गेले आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर पंधरा फूट लांब फेकले गेले, तर बाहेर उभा असलेला कंपाउंडर जखमी झाला. मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर असावे असाही कयास लावला जात आहे. फ्रिज व सॅनिटायझरने पेट घेतल्यामुळे स्फोट झाला व डॉक्टर बाहेर फेकले गेले असावे, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याप्रकरणी मयत डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close