महाराष्ट्र
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर प्रशासक पाहणार कारभार The administrator will take care of the delay in the Gram Panchayat elections in the state

बीड — डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे
पडघम वाजण्याची वाट पाहत असतानाच या निवडणुका जवळपास तीन महिने लांबणीवर पडणार आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत
राज्यातील तब्बल 7649 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर पर्यंत संपत आहे. तर बीड जिल्ह्यातील सातशे चार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कधी लागते याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मात्र आणखी तीन महिने तरी ग्रामपंचायती निवडणूक घेण्यास राज्य निवडणुक आयोगाने असमर्थता दाखविली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यास लागणार विलंब लक्षात घेऊन या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.