आपला जिल्हा

दिवसभरात सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव आले

बीडसुरुवातीला आंबेवडगाव व मालेगाव बुद्रुक येथे दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आल्यानंतर आणखी चार रुग्ण नंतर आलेल्या अहवालात पॉझिटिव आढळून आले आहेत त्यामुळे आज रुग्ण संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे. तर आष्टी तालुक्यातील मातावळी येथील पस्तीस वर्षीय मृत युवकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
सुरुवातीला प्राप्त झालेल्या अहवालानुसार धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील दहा वर्षीय मुलगा व गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील 18 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली होती. मात्र नंतर प्रलंबित अहवालाचे रात्री उशिरा निष्कर्ष आले. त्यात हैदराबाद येथून बीडच्या मासरत नगर येथे आलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव आले. आष्टी तालुक्यातील मातावळी येथे मुंबईहून आलेल्या 35 वर्षीय युवकाचे सुरवातीला दोन वेळा स्वॅबचे निष्कर्ष निघू शकले नव्हते. त्यामुळे तिसऱ्या वेळेला या रुग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर काही कालावधीतच या युवकाचा मृत्यू झाला. या रुग्णाचा सुद्धा अहवाल पॉझिटिव आला आहे त्यामुळे आज दिवसभरात रुग्णांची एकूण संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close