कृषी व व्यापार

डॉ.ढवळेंच्या नेतृत्वाखाली पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा लिंबागणेश मध्ये चक्काजाम. Farmers protest in Limbaganesh for crop insurance under the leadership of Dr. Dhavale

बीड — पिक विमा कंपनीने 47 मह्तूल मंडळापैकी 27 मंडळांना 25 टक्के आग्रीम नाकारल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत चक्काजाम केला. या आंदोलनात शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले.

खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेले असतानाही विमा कंपनी 25 टक्के अग्रीम देण्यास नकार देत असुन 47 पैकी अवघ्या 20 महसुल मंडळातील शेतक-यांनाच अग्रीम मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरीपाची पिके करपुन गेली,हलक्या जमिनीवरील पिकांचा खराटा झाला,सोयाबीनला फुले लागण्याच्या महत्वाच्या काळातच पाऊस पडला नाही

यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी 47 महसुल मंडळातील पीक विमा धारक शेतक-यांना विमा अग्रीम देण्याच्या संदर्भाने 3 वेगवेगळ्या अधिसुचना काढल्या होत्या. यामध्ये प्रथम 16 महसुल मंडळे,दुसरी 10 आणि तिसरी 21 अशी एकुण 47 महसुल मंडळासाठी अधिसुचना काढण्यात आल्या होत्या.

दि.13 सप्टेंबर रोजी पिकविमा कंपनी प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत 47 महसुल मंडळातील पिक विमा धारक शेतक-यांना अग्रीम देण्यासंदर्भात निर्णय झाला होता.दरम्यान बजाज अलायन्झ पिक विमा कंपनीने जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी,औरंगाबाद विभागीय आयुक्त व पुणे येथील मुख्य सांख्यिकी विभागास पत्र लिहून बीड जिल्ह्य़ातील 47 पैकी 27महसुल मंडळे निकषात बसत नसल्याने अपात्र ठरवण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा व अग्रिम पीक विमा तात्काळ देण्यात यावा .
बीड तालुका कृषि विभागाच्या महसुल मंडळाची सोयाबीन पिकातील सर्वेक्षण मंडळ निहाय अहवाल नुसार लिंबागणेश महसुल मंडळातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी 70 ,पिंपळनेर 68 , नेकनुर 55 , घाटसावळी57 ,येळंबघाट 54 ,चौसाळा 55 असुन सुद्धा लिंबागणेश,नेकनुर,पिंपळनेर,
घाटसावळी,येळंबघाट,चौसाळा व अन्य 21 अशी एकूण 27 मंडळे अपात्र ठरविण्यात आली असून या अन्यायकारक निर्णया विरोधात अपात्रेतचा निर्णय तात्काळ रद्दबातल करण्यात येऊन सरसकट 25 अग्रीम पिक विमा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी आपल्या सर्जा राजासह हजर राहिले.

SHARE

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button