आरोग्य व शिक्षण

This is Gandhigiri: Education department celebrated the right to information day by singing the national anthem अशी ही गांधीगिरी:शिक्षण विभागात राष्ट्रगीत गायनाने केला माहिती अधिकार दीन साजरा

माहिती अधिकारात माहिती मागूनही माहिती मिळेना

शिवसंग्रामचे मनोज जाधव यांनी केली गांधीगिरी

बीड — जन माहिती अधिकारात माहिती मागूनही शिक्षण विभाग महती उपलब्ध करून देत नसल्याने जन माहिती अधिकार दिनी दी. २८ सप्टेंबर रोजी शिक्षण विभाग येथे शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी राष्ट्रगीताचे गायन करत जन माहिती अधिकार दीन साजरा केला. या वेळी शिवसंग्रामचे सामजिक न्यय विभाग जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, योगेश शेळके शेख अखिल भाई, अनिकेत देशपांडे, कैलास शेजाळ, अशोक लोकरे, शेख लालाभाई, पांडुरंग बहिर, रवी घुमरे आदी. या गांधीगिरीला उपस्थित होते.

शिक्षण विभाग बीड येथील कार्यालयात दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड येथील जन माहिती अधिकारी यांच्या कडे मनोज जाधव यांनी ३ माहिती अधिकार रितसर दिले होते. त्या मध्ये त्यांनी लोकहिताची माहिती, माहिती अधिकारात मागवली होती. माहिती अधिकार देऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप माहिती मिळाली नाही किंवा या कार्यालयातून पत्र व्यवहार , फोन, मेल, व्हॉट्सअँप या मध्मातून कसला ही संपर्क साधला गेला नाही. या अनुषंगाने त्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड येथील अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपिलीय अर्ज दाखल केला होता.
या देशात सर्वसामान्य नागरिकांना सहज माहिती उपलब्ध व्हावी म्हणून २८ सप्टेंबर रोजी जन माहिती अधिकार अमलात आणला या दिवसाला “जन माहिती अधिकार दिन” म्हणून देखील संबोधले जाते माहितीच्या अधिकारात माहिती मागूनही ती दिली जात नसल्याने आपण माहिती अधिकार दिना दिवशी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड येथे राष्ट्रगीत गाऊन माहिती अधिकार दीन साजरा केला. या वेळी त्यांनी माहिती अधिकार दिनाच्या विजय असो असा जय जयकार केला आणि माहिती अधिकाराच्या अर्जाला शिक्षण विभाग किती गांभीर्याने घेते याकडे जनतेचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शिक्षण विभागचे डोळे उघडण्यासाठी हे गांधीगिरी केली असल्याचे ही त्यांनी सांगितले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button