क्राईम

एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

परळीखदानीत असलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुली सहित तिचा लहान भाऊ व बहिण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दाऊतपुर शिवारात आज सकाळी घडली.

दाऊतपुर शिवारातील औष्णिक वीज केंद्राकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या खडीमशीन जवळ ही खदान आहे. याठिकाणी नांदेड जिल्ह्यातील वसरूणी येथील मजूर कुटुंब मजुरीसाठी आलेले आहे. या दगडफोडीसाठी आलेल्या कुटुंबातील 15 वर्षीय मुलगी खदानीत कपडे धुण्यासाठी गेली असता हिच्यासोबत तिचे लहान बहिण भाऊ हे दोघे सोबत होते. मात्र या पाण्यात बुडत असलेल्या बहीण भावाला वाचवण्याचा प्रयत्नात या तीनही बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा असा करूण अंत झाल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच याठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दरम्यान यात मृत पावलेल्या मुलांचे नाव अद्याप समजू शकले नाही

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close