Hearing of power struggle in Maharashtra now after Diwali महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता दिवाळीनंतर

मुंबई — धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मात्र आमदारांची अपात्रता, राज्यपालांचा निर्णय या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता दिवाळीनंतर होणार आहे
मंगळवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आमदारांची अपात्रता, राज्यपालांचा निर्णय या याचिकांवर आता १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील सुनावनीला न्यायालयात तारीख पे तारीख सुरुच आहे.शिंदे गटाच्या अर्जावर न्यायालयाने मंगळवारी सकाळी साडेदहा पासून संपूर्ण दिवस सुनावणी घेतली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय न्यायालयाने दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य प्रकरण आता थेट 1 महिन्यांनी लांबणीवर गेले आहे. अपात्रतेची याचिका, इतर मुद्द्यांवर घटनापीठासमोर दिवाळीनंतरच सुनावणी होणार आहे.