पिक विमा कंपनी विरोधात लिंबागणेश येथे गुरुवारी चक्काजाम. A sit-in against Pick Insurance Company in Limbaganesh on Thursday

बीड — पिक विमा कंपनीने 47 महसुल मंडळापैकी 27 महसूल मंडळ अग्रीम पीक विमा साठी अपात्र ठरवली याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी लिंबागणेश येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी बीड यांनी 47 महसुल मंडळातील पीक विमा धारक शेतक-यांना विमा अग्रीम देण्याच्या संदर्भाने 3 वेगवेगळ्या अधिसुचना काढल्या होत्या. दि.13 सप्टेंबर रोजी पिकविमा कंपनी प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत 47 महसुल मंडळातील पिक विमा धारक शेतक-यांना अग्रीम देण्यासंदर्भात निर्णय झाला होता. एकुण तीन अधिसुचनाही काढण्यात आल्या होत्या. दरम्यान बजाज अलायन्झ पिक विमा कंपनीने जिल्हाधिकारी,जिल्हाअधिक्षक कृषी आधिकारी,औरंगाबाद विभागीय आयुक्त व पुणे येथील मुख्य सांख्यिकी विभागास पत्र लिहून बीड जिल्ह्य़ातील 47 पैकी 27 महसुल मंडळे निकषात बसत नसल्याने अपात्र ठरवण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा व अग्रिम पीक विमा तात्काळ देण्यात यावा
अग्रीम पिक विम्यासाठी वगळलेल्या गावांची सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट 50 टक्क्यापेक्षा जास्त असुनही अग्रिम पिकविमासाठी अपात्र ठरवण्याचा कंपनीचा निर्णय अन्यायकारक आहे.बीड तालुका कृषि विभागाच्या महसुल मंडळाची सोयाबीन पिकातील सर्वेक्षण मंडळ निहाय अहवाल नुसार लिंबागणेश महसुल मंडळातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी 70 असुन सुद्धा लिंबागणेश,नेकनुर,पिंपळनेर,
घाटसावळी,येळंबघाट,चौसाळा व अन्य 21 अशी एकूण 27 मंडळे अपात्र ठरविण्यात आली आहेत. या अन्यायकारक निर्णया विरोधात अपात्रेतचा निर्णय तात्काळ रद्दबातल करण्यात येऊन अग्रीम पिक विमा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी गुरुवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
Good article. I definitely appreciate this website.
Stick with it!