कुलस्वामिनी अंबाबाई; महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. Kulaswamini Ambabai Mahalakshmi Temple Kolhapur

कोल्हापुर — महालक्ष्मी म्हणजेच आपली अंबाबाई हे सर्वात जुने देऊळ असून या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असे केलेले आहेत. कोल्हापूरची अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात. ज्या वेळी मुघलांचे शासन होते त्या वेळी त्यांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व देऊळांचा विध्वंस आणि नासधूस केली. त्यावेळी या देऊळाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्याने बरीच वर्षे लपवून ठेवली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ई.स. 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली. या देऊळात महालक्ष्मी आणि त्यांचा समोर गरुडमंडपात गरुड स्थापित केले गेले आहे. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्रॅम आहेत. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे.