राजकीय

तर मोदीही माझ राजकारण संपवू शकत नाहीत — पंकजा मुंडे. So even Modi can’t end my politics — Pankaja Munde

अंबाजोगाई — मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमत्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे या बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी जनतेच्या मनात असेल तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. काँग्रेस मध्ये वंशवादाचे राजकारण सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंशवाद संपवत आहेत हे सांगताना पंकजा मुंडे थोड्या थांबल्या आणि मी देखील वंशवादाचं प्रतिक असल्याचे त्या म्हणाल्या. पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही.
राजकारणात आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. मात्र, अलिकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नसल्याच त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत.
कधी विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले गेले.
ते सर्व अंदाज भाजप नेत्यांनी फेटाळले. अशातच पंकजा मुंडे यांनी बीडमधील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button