एफडीएच्या हास्मी ची “किस”मी जनतेच्या जीवावर उठली; दोनशे जीव धोक्यात आल्यानंतर त्यांनी वराती मागून घोडे दामटली

बीड — अन्न व औषधी प्रशासन विभागाची भेसळ करणारांशी असलेली मिली भगत जनतेच्या जीवावर बेतू लागली आहे भेसळयुक्त भगर खाल्ल्यामुळे जवळपास 200 जणांना विषबाधा झाली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत मोंढ्यातील प्रितेश खिवंसराच्या ओम एजन्सीवर छापेमारी करत भगर जप्त केली.मात्र आधीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती एफडीए सहाय्यक आयुक्त हाश्मीं नी भेसळ करणारांशी केलेली किस मी आणखी जनतेचे बळी घेणार काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
जिल्ह्यात राजरोस गुटखा विक्री चालू असली तरी त्यावर कारवाई केलीच जात नाही.भेसळयुक्त खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री करत जनतेच्या जीवाशी खेळ केला जात आहे. अन्न भेसळ विभागाच्या कारवाईची व्यापाऱ्यांना भीती वाटतच नाही. अधिकाऱ्यांचाही वचक नाही. एखाद्या आंदोलनकर्त्यांने गांधीगिरी करत फुलाने सजवलेली गुटखा भरून टोपली भेट म्हणून दिली तरी आम्ही काय करावं आमच्या जवळ माणूस बळच नाही असं निर्लज्जपणाचं उत्तर एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून दिल्या जात. मग माणूस बळच नाही तर हा विभाग तरी जिल्ह्याच्या ठिकाणी का ठेवायचा या विभागाची गरज नाही असं पत्र देण्याचा धाडस मग हे अधिकारी का करत नाहीत? फुकट पगारी घेऊन शासनाचं नुकसान या अधिकाऱ्यांनी तरी का करावं असा प्रश्न निर्माण होतो.
एफडीए च अस्तित्व सर्वसामान्यांना कधी जाणवतच नाही तो विभाग अस्तित्वात आहे हे देखील जनता विसरू लागली आहे. भेसळ करणारा विरोधात कारवाई केली जात नाही त्यामुळे तक्रार करून डोळ्यावर कशाला यायचं असा विचार करून जनता ही तक्रार करायला धजावत नाही
व्यापाऱ्याचा देखील अधिकारी कर्मचाऱ्यांशी संबंध येतो तो हप्ते देण्यापुरता. त्यामुळेच निर्बंध असलेली अनेक औषध मेडिकल दुकानात बिनधास्त विकली जातात. कधी मेडिकल दुकानावर देखील कारवाई झाल्याचं दिसतच नाही. या सर्व प्रकारातूनच भेसळ करणाऱ्यांचे मनसुबे बुलंद झाले आहेत. त्यातूनच काल दोनशे जणांना भगरीतून विषबाधा झाली.असे प्रकार नित्याचे असताना अन्न भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली नाही. परिणामी 200 भाविकांच्या जीवावर ही गोष्ट बेतली. भगरीतून विषबाधा झाली. त्यानंतर भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जागे झाले. त्यांच्या दलालाने टीप दिली अन् धाड सत्राचा खेळ सुरू झाला. प्रितेश माणिक खिवंसराच्या ओम एजन्सीवर कारवाई करत 1800 किलो भगर जप्त करण्यात आली. या एजन्सी मधून पाच टन भगर विक्री झाल्याचा सहाय्यक आयुक्त हाश्मी यांनी स्थानिक दैनिकाला माहिती देताना अंदाज व्यक्त केला. कोण कोणत्या दुकानावर माल विक्री केला गेला याची माहिती घेण्यातच एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिवस घालवला. पत्रकारांना माहिती देण्यास ही टाळाटाळ केली. प्रेस नोट पाठवून देऊ सध्या आम्ही कामात आहोत असं उत्तर देत बोळवण केली.आता हे प्रकरण दडपण्यासाठी दलाल सक्रिय झाला आहे. त्यामुळे याच खिवंसराची चौसाळ्यातील एजन्सीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. तिथे राजरोस भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री केल्या जाते.लाखो रुपयांचा गुटखा ठेवला जातो हे सर्वश्रुत असून कारवाई करण्याचं धाडस अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही.ग्रामीण भागाला या एजन्सी मधून भेसळयुक्त अन्नधान्यासह खाद्यपदार्थांची विक्री करून ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. मग अशा एजन्सी विरोधात एफडीएचे हाश्मी कारवाई करणार काय? की हे सर्व प्रकरण देवानघेवाणीत मिटवले जाणार काय? जनतेच्या आरोग्याशी कुठपर्यंत खेळले जाणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तरी विशेष लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
It’s remarkable to pay a quick visit this web page and reading
the views of all colleagues concerning this article, while I am also eager of getting know-how.