आपला जिल्हा

धारूरच्या आंबेवडगावात पुन्हा दोन कोरोना रुग्ण सापडले

बीडधारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे मुंबईहून आलेले दोन जण पुन्हा कोरोना पॉझिटिव आढळले आहेत. शुक्रवारी याच गावातील एकाचा अहवाल पॉझिटिव आला होता त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
आंबेवडगाव येथे मुंबईहून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आंबेवडगाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या माजलगाव व धारुर तालुक्यातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते‌ या गावातील व्यक्ती जण या रुग्णाच्या संपर्कात होते त्यापैकी ‌ 14 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. एक 32 वर्षीय तर दुसरी 25 वर्षीय महिला आहे ‌. आज पाठवलेल्या 53 स्वॅब पैकी सत्तेचाळीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार जणांचा कुठलाही निष्कर्ष निघू शकला नाही.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close