आपला जिल्हा

अनलॉक वन मुळे भारतात कोरोना रुग्ण संख्येचा होणार स्फोट

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भीती

जिनिव्हाभारतातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी अनलॉक वन ची घोषणा करत निर्बंध शिथिल केले मात्र भारताच्या या निर्णयामुळे देशात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मिशेल रेयान यांनी ही शक्यता वर्तविली आहे. रेयान यांनी म्हटले आहे की, या महामारी चा भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळा प्रभाव दिसून येत आहे शहरी व ग्रामीण भागातील परिस्थितीमध्ये देखील फरक आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही परिस्थिती अद्याप स्फोटक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

महासाथीच्या काळात आजार लोकांमध्ये पसरल्यानंतर कोणत्याही क्षणी अधिक व्यापकपणे फैलावण्याचा धोका असतो. याआधीदेखील अशाच प्रकारे करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. भारतात लॉकडाउनमुळे संसर्ग फैलावण्याचा वेग मंदावला होता. मात्र, त्यात आता शिथिलता देण्यात येत असल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, शहरात लोकसंख्येची अधिक घनता असणे, हातावर पोट असणाऱ्यांना दररोज कामावर जाण्याशिवाय पर्याय नसणे आदी काही गोष्टींमुळे संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. 
भारतात करोनाबाधितांची संख्या २ लाखांहून अधिक झाली आहे. रुग्ण संख्येत भारताने इटलीला मागे टाकले असून सर्वाधिक रुग्णांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, देशात करोनाचे सर्वाधिक ९८८९ रुग्ण आढळले. तर, २९४ जणांचा मृत्यू झाला. देशभरात ६६४२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close