क्राईम

दसऱ्याचे धुणे पिता पुत्रांच्या जीवावर बेतले. Father and son die of shock ; शॉक लागून मृत्यू

तुळज़ापूर — दसऱ्याचे धुणे छतावर वाळत घालण्यासाठी मुलगा गेला असता घरावरून गेलेल्या तारेचा करंट त्यास बसला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा देखील शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे घडली.

नवरात्र उत्सव सुरू होणार असल्यामुळे घरातील धुणे काढण्याची परंपरा पिता पुत्रांच्या जीवावर उठली. खडकी येथील जय सचिन भंडारे हा 11 वर्षाचा मुलगा धूणे वाळत घालण्यासाठी घरच्यांना मदत करू लागला. रविवारी दुपारी धुणे वाळत घालण्यासाठी घराच्या गच्चीवर तो गेला त्यावेळी त्यास घरावरून गेलेल्या विद्युत तारेचा धक्का बसला. तो जोरात ओरडला त्याचा आवाज ऐकून त्याचे वडील सचिन श्याम भंडारे वय 35 वर्ष हे धावत छतावर गेले. समोर पाहिले तर जय तारेला चिकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता तारेपासून ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघेही छतावरून खाली पडले यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दोघांच्या आवाजाने आजूबाजूची मंडळी धावत आली त्यांनी दोघांनाही तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button