ताज्या घडामोडी

पूरवठ्यातील कर्मचारी खुर्चीला चिकटले; अन् गरीबांच्या हक्काचे धान्य हिरावले गेले The supply department staff clung to the chair; And the grain of the right of the poor was taken away

बीड — महसूल विभागातील तब्बल 144 कर्मचाऱ्यांच्या 25 ऑगस्ट रोजी बदल्या करण्यात आल्या.एक महिना उलटून गेला तरी हे कर्मचारी आपल्या खुर्चीला चिटकून बसले आहेत. यात बीड तालुका पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या मात्र खुर्च्या सोडल्या नसल्या तरी त्यांनी चलन वाटप केले नसल्यामुळे सणासुदीच्या तोंडावर देखील गोरगरिबांना स्वस्त धान्य मिळणे अवघड होऊन बसले आहे. मग महिनाभर या कर्मचाऱ्यांनी नुसत्या खुर्च्याच उबविल्या की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महसूल विभागातील 144 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेश 25 ऑगस्ट ला काढण्यात आले. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास पाच सप्टेंबर पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले. परंतु अद्याप एकाही कर्मचाऱ्यांने आपली खुर्ची न सोडता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. तालुका पुरवठा विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा देखील या बदली आदेशात समावेश आहे. नायब तहसीलदार बाळासाहेब जाधवर यांची पिंपळनेरला तर श्रीराम वायभट यांची नेकनूर येथे गोदाम निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. हे दोन्ही कर्मचारी बदलीच्या जागेवर अजून रुजू झाले नाहीत. असं असलं तरी पुरवठा विभागातील कामात कुठलीच गती आली नाही. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी महिनाभर खुर्ची उबविण्याचच काम केलं. त्यांनी केलेल्या कुचराईमुळे अद्याप ग्रामीण भागातील राशन दुकानदारांना चलन वाटप करण्यात आलेच नाही. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात गोरगरीबांना हक्काच धान्य मिळणार नाही. सप्टेंबरची 26 तारीख निघून गेली अद्याप चलन वाटप झालेच नाही दुकानदारांनी चलन कधी भरायचं, ते कधी जमा करायचं त्यानंतर परमिट मिळणार कधी? गोदाम निरीक्षक धान्य दुकानदारांना पाठवणार कधी? ते धान्य दुकानदार वाटणार कधी? असे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. खाजगी व्यक्तीच्या मदतीने चलनाचे पैसे गोळा करायचे स्वतःची तुंबडी भरायची नंतर पदभार सोडायचा की स्वस्त धान्य दुकानाचा सर्वच धान्य हडप करायचं असा डाव आहे काय? असा प्रश्न देखील जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button