ताज्या घडामोडी

गेवराईत तीन वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला. In Gevrai, a three-year-old boy was swept away in the stream

गेवराई — शहरात सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे यातच बालवाडीतून घरी येत असताना तीन वर्षाच्या मुलाचा पाय घसरून नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली.
गेवराई शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे चिंतेश्वर गल्लीतील नाल्याला पाणी आले होते. दुपारी बंटी ज्ञानेश्‍वर क्षीरसागर हा तीन वर्षीय मुलगा बालवाडीतून घरी येत होता. त्याचा पाय घसरल्याने तो नाल्यात पडला आणि वाहून गेला. हा मुलगा विद्रुपा नदीत वाहून गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी तहसीलदार सचीन खाडे, संतोष जवंजाळ, न.प.चे येवले, लेंडाळ, पांढरे दाखल झाले होते. दुपारपर्यंत बालकाचा शोध घेणे सुरू होते मात्र त्यात यश आले नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button