आरोग्य व शिक्षण

कोरोनाचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम !

बीजिंगकोरोना विषाणूमुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात. याबाबत ही सध्या संशोधन सुरू आहे. नुकत्याच समोर आलेल्या संशोधनात पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर कोरोनाचा परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

कोरोना संसर्गाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो यासंदर्भात चीनमधील टफ्ट्स युनिर्व्हसिटी आणि गोंगई मेडिकल कॉलेजचे संशोधक अभ्यास करत आहेत. या अभ्यासात पुरुषांच्या अंडकोषात विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळले. करोनाबाधितांच्या अंडकोषात शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशींमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची शंका संशोधकांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे पुरुषांच्या वीर्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळेच शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. त्याशिवाय रुग्णाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास शुक्राणूंची निर्मिती थांबू शकते, असा इशाराही संशोधकांनी दिला. करोना विषाणू हा मुख्यत: खोकला, सर्दी, बोलण्यातून हवेत उडणाऱ्या लाळेतील तुषार कणांमुळे फैलावतो. करोनाचा संसर्ग सेक्स केल्यामुळेदेखील फैलावू शकतो का, याबाबतही संशोधनही सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या संशोधनानुसार शुक्राणूमध्ये करोनाचा विषाणू आढळला नसल्याचे समोर आले आहे.
काही संशोधनानुसार, करोनाचा विषाणू पुरुषांतील अंडकोषात आपले स्थान निर्माण करू शकतात. त्यामुळे सध्या तरी लोकांनी ‘स्पर्म डोनेट’ न करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. संशोधकांनी १२ पुरुषांच्या अंडकोषाच्या पेशीचा बॉयोप्सी केली होती. करोनाच्या संसर्गामुळे या पेशी निष्क्रीय झाल्या असल्याचा दावा करण्यात आला होता. 
दरम्यान, करोनाच्या संसर्गामुळे जगभरात थैमान घातले असून अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. करोनच्या आजारावर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू असून आजाराबाबत खबरदारी घेण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरत आहे. कोरोनाच्या आजारात रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होतो. श्वसन त्रास हा रक्तगटावर आधारीत असल्याचे संशोधनात समोर आले आहे. युरोपमधील विविध देशांतील १२० संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. यामध्ये इटली व स्पेनजवळील जवळपास ४००० हजार रुग्णांच्या जनुकांचा अभ्यास केला. यातील १९८० जणांना करोनाच्या संसर्गामुळे श्वसनसंबंधी त्रास झाला होता. तर, उर्वरीत जवळपास २००० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. यातील यामध्ये ए रक्तगटाच्या रुग्णांना श्वसनाचा अधिक त्रास झाला. तर, ओ पॉझिटीव्ह रुग्णांना कमी धोका असल्याचे संशोधनात समोर आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close