देश विदेश

भारतातील लाॅक डाऊन अयशस्वी — राहुल गांधी

नवी दिल्ली – भारतात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाॅक डाऊन करण्यात आले. त्यास चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र लॉक डाऊन पूर्णपणे अयशस्वी झाला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. पुरावा म्हणून
स्पेन, जर्मनी, इटली, ब्रिटनसह भारताचा आलेख त्यांनी शेअर केला आहे

कोरोना महामारी मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार आपली भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने लाॅक डाऊनचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की जगातील इतर राष्ट्रांमध्ये लॉक डाउन हटवताना रुग्णांची संख्या कमी होतेय तर याउलट चित्र भारतात आहे. हे चित्र स्पष्ट करणारे ग्राफ त्यांनी ट्विटमध्ये दाखवले आहेत पेन जर्मनी इटली ब्रिटन व भारताच्या आलेखात भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत लॉक डाउन हटवताना रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे. यावरूनच हे लॉक डाऊन संपूर्णपणे यशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत आहे ‌ लॉक डाऊन पाॅझ बटना सारखे असून चाचण्या वाढवल्या तरच यशस्वीपणे कोरोना सोबत लढणे शक्य होणार आहे. कोरोना संकटामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती असून रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close