राजकीय

चुकीचा आहे त्याला जनताच उत्तर देईल- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर. The people will answer whoever is wrong in the form of voting — Former Minister Jayadat Kshirsagar

बीड — आपले नाणे खणखणीत आहे काळजी करू नका नुसता चांगला असणं महत्त्वाचं नाही तर ते चांगलं लोकांनाही कळलं पाहिजे तरच त्याचं चांगुलपण टिकत असतं, जो चुकीचा आहे आणि चुकणार आहे त्याला जनताच आता मतदान रूपातून उत्तर देईल असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

आज श्री गजानन सहकारी सुतगिरणीची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली

याप्रसंगी उपस्थित सुतगिरणीचे उपाध्यक्ष माधवराव मोराळे व गजानन बँकेचे उपाध्यक्ष प्रा जगदीश काळे,श्री गजानन बँकेचे व्यवस्थापक एम आर क्षीरसागर व सरव्यवस्थापक शेख साहेब व गजानन बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक विलास कुंभेफळकर व जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे,गणपत डोईफोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम,विलास बडगे,अरुण डाके, ऍड राजेंद्र राऊत, सखाराम मस्के,अरुण बोंगाणे, दिलीप शेळके, अंकुश उगले, देविदास मनचुके, शेषराव फावडे, पांडुरंग कदम, अरुण लांडे, देविदास चरखा, कोंडीराम निकम, बालाप्रसाद जाजू,शेख नसीर शेख रमजान, अशोक घुमरे, बाबुराव राठोड संपत गुंदेकर जयदत्त थोटे अच्युतराव मुंडे गोरख दंने, प्रा राजू मचाले राहुल टेकाळे, नागसेन मस्के, अच्युत शेंडगे सखाराम ठोकळ, कल्याण बाप्पा खांडे, अंबादास जाधव, आदी मान्यवर तसेच सुतगिरणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ काळे,व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व या भागातील सर्व सरपंच व क्षीरसागर यांच्या वर प्रेम करणारे सर्व शेतकरी उपस्थित होते,प्रारंभी दीपप्रज्वलन आणि स्व काकू नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी प्रास्ताविक एम डी काळे यांनी केले तर गणपत डोईफोडे,जि प सदस्य गंगाधर घुमरे,दिनकर कदम,आणि प्रा जगदीश काळे यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,दुष्काळी परिस्थिती ,कोरोना महामारी असतानाही गजानन सहकारी सुतगिरणीचे काम हे चांगल्या प्रकारे चालु आहे, उत्तम दर्जाचे सुत तयार होत असल्यामुळे आपल्या बीड जिल्ह्यातील सुत हे विदेशात निर्यात करत आहोत,विदेशात निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव आपण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व यापुढेही चांगला भाव दिला जाईल,या सर्वांचा परिणाम म्हणून गजानन सुतगिरणी महाराष्ट्र राज्यात एक नंबर वर आहे,याचा मनस्वी आनंद आहे, श्री गजानन नागरी सहकारी बँकेला सलग चार वर्षे महाराष्ट्र राज्यातुन प्रथम पारितोषिक मिळाले आहे, तालुका दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात आता तरुणांनी काम केलं पाहिजे, श्री गजानन बँकेच्या माध्यमातून आपण तरुणांना मदत केली आहे व यापुढेही करत राहणार आहोत, या संस्थेच्या यशस्वीपणे वाटचालीत, संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान आहे, हि संस्था बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे, आपल्या भागातील कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रेशीम कोष खरेदी करण्यात येत आहे, आता बाहेरचे व्यापारी आता बीड मध्ये येऊन रेशीम कोष खरेदी करत आहेत,सुत गिरणीच्या माध्यमातून व श्री गजानन बँकेच्या माध्यमातून व तरुणांना रोजगार निर्मिती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, शेतकरी बांधवांच्या कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहेत, आता विकासात्मक दृष्टीकोनातून आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत, आजची ही सभा कुठलाही आड पडदा न ठेवता बिनधास्तपणे व्यक्त करणारी सभा ठरली आहे विचार मंथन व्यक्त करताना अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले विकास साधण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो जो चुकणार आहे त्याला जनताच आता मतदान रूपातून उत्तर देणार आहे आपले नाणे खणखणीत आहे पण नुसते चांगले असणे महत्त्वाचे नाही तर ते चांगले लोकांपर्यंत गेले पाहिजे तरच त्याचे चांगुलपण टिकेल आता जनता हुशार झाली आहे काम करणारा कोण आणि फसवणारा कोण हे सांगण्याची आता गरज राहिली नाही दीर्घकालीन कामे करत असताना अनेक अडचणी येत असतात मात्र आपण त्यातूनही मार्ग काढून कामांमध्ये सातत्य ठेवत असतो बीड पिंपळनेर रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत या रस्त्याला केंद्रीय रस्ता जोडला जावा म्हणून दोन स्लिप रोड ची मागणी आपण लावून धरली आहे आपण जसे पेरतो तसेच उगवणार आहे आपण समाजासाठी काम करतो समाज आपल्याला मतदान रूपातून त्याची परतफेड करत असतो विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे कोण कुठे जातो याकडे न पाहता आपण जात आहोत तो रस्ता योग्य आहे हे लक्षात घेऊन काम करा जो संपत आहे त्याचे नाव घेऊन त्याला मोठे करू नका आता जागरूकता निर्माण झाली आहे,त्यामुळे खरे खोटे लगेच उघडे पडत आहे असे सांगून त्यांनी उपस्थित कार्यकर्यांमध्ये जोश निर्माण करून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज राहायचे संकेत दिले,यावेळी मोठ्या संख्येने सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button