क्राईम

शिंदे गटाचे आ. संतोष बांगर यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला.Shinde group MLA Santosh Bangar attacked by Shiv Sainiks

अंजनगाव सुर्जी — शिंदे गटाचे कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांना शिवसैनिकाच्या रोषाला सामोरे जावे लागले. नारे बाजी करत त्यांच्या गाडीवर हल्ला केला मात्र गाडी न थांबवल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घेतला होता. परंतु दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेतून शिंदे गटात जाणारे गटात जाणारे ते शेवटचे आमदार होते.25 सप्टेंबरला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनासाठी ते आले. दुपारी 3 वाजता ते मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले.सायंकाळी 6 च्या सुमारास ते मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी ताफ्यातील त्यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या वाहनावर हल्ला करत नारेबाजी केली. आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे, हे कळले नाही. त्यांचे वाहन न थांबविता घटनास्थळाहून काढण्यात आले. या घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button