आपला जिल्हा

आज धारुर तालुक्यात सापडला कोरोना रुग्ण

बीडजिल्ह्यात दोन दिवसाचा खंड पडला की कोरोना पॉझिटिव रुग्ण सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे मुंबईहून आलेली 65 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळून आली आहे.

सकाळी जिल्ह्यातून 30 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सायंकाळी सर्व अहवाल प्राप्त झाले. यात धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित 29 अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. कोरोनाबाधीत वृध्द व्यक्ती मुंबईतून गावी परतलेली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close