दुचाकी चोराच्या शिवाजीनगर पोलिसांनी आवळल्या मूसक्या. Two-wheeler thief arrested by Shivajinagar police

बीड — नगर नाक्यावरील खाजगी दवाखान्यात नातेवाईकास भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची मोटार सायकल 24 सप्टेंबरला चोरी झाली होती. मात्र गुन्हा दाखल होताच 24 तासाच्या आत शिवाजीनगर ठाण्याच्या डीबी पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले
म्हाळसापुर येथील अरुण लक्ष्मण राऊत हे आपल्या दुचाकी क्र. एम एच 23 व्ही 9673 वरून आजारी मेहुण्यास भेटण्यासाठी नगर नाक्यावरील खाजगी रुग्णालयात 24 सप्टेंबर रोजी पत्नीसहआले होते. ते दवाखान्यात भेटण्यासाठी गेले असता गणेश विठ्ठल भांडवलकर वय 30 वर्ष रा. संस्कार कॉलनी बीड याने दारूच्या नशेत त्यांची दुचाकी पळवली. रुग्णास भेटल्यानंतर अरुण राऊत अर्ध्या तासाने दवाखान्या बाहेर आले असता दुचाकी गायब असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 25 सप्टेंबर रोजी गाडीच्या कागदपत्रासह फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्ही फुटेज चा आधार घेत गणेश भांडवलकर यास बेड्या ठोकल्या.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि.केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, हवालदार फेरोज पठाण, पाे.ना. शेख मोहसीन, अंमलदार सुदर्शन सारणीकर, विलास कांदे, राम सानप यांनी केली.