ताज्या घडामोडी

ज्योत आणण्यासाठी तुळजापुरला जाणाऱ्या दोन युवकांचा अपघातात मृत्यू. Two youths who were going to Tuljapur to bring flame died in an accident

बीड — सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूरच्या देवीची ज्योत आणण्यासाठी मोटर सायकल वर जात असलेल्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

नवरात्रोत्सवाच्या निमित्त सांगवी पाटण येथे तुळजापूरच्या देवीची ज्योत आणण्याची प्रथा आहे.सोमवारी घटस्थापना असल्याने गावातील 50 तरूण भाविक शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकी, टेम्पो, पिकअप अशा वाहनातून ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले. या भाविकांमधील महेश भोसले वय 31 वर्ष अमोल खिलारे वय 38 वर्ष हे दोघेजण दुचाकीवरून निघाले होते.दरम्यान, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button