आपला जिल्हा

राज्यांना दिलासा ; केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिली जीएसटी भरपाई

नवी दिल्लीकोरोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारांना सुखद धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काही महिन्यापासून प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर भरपाईचे (GST Compensation) ३६४०० कोटी आज केंद्राने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले त्यामुळे राज्य सरकारांपुढे असलेले आर्थिक संकट काही प्रमाणात कमी झाले आहे.

राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वस्तू आणि सेवा कर भरपाईपोटी 36 हजार 400 कोटी रुपये देण्यात आले असल्याची अर्थ विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर 2019 या कालावधीपर्यंत राज्य सरकारांना GST Compensation चे ११५०९६ कोटी वितरित केले होते. गेल्या महिन्यात देखील केंद्र सरकारने १५३४० कोटी जीएसटी भरपाई म्हणून वितरित केले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्याच्या आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटी भरपाई रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी केली होती. राज्याचे GST पोटी ५०४० कोटी केंद्र सरकारकडून येणे बाकी होते. मात्र आजच्या निर्णयात राज्यालासुद्धा जीएसटी भरपाई मिळाली आहे. एकीकडे केंद्र सरकारला आर्थिक आघाड्यांवर संघर्ष करावा लागत असल्याने GST Compensationचा निधी देण्यास विलंब झाला होता. कर महसुलात घट झाल्याने जीएसटी परतावा देण्याबाबत दिरंगाई झाली होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला होता. 
लॉकडाउनमुळे एप्रिल पूर्ण महिना बहुतांश राज्यांमध्ये जीएसटी कर उत्पन्न ९० टक्क्यांनी कमी झाले होते. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, पंजाब , आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांच्या तिजोरीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या राज्यांनी केली होती. 

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close