महाराष्ट्र

अखेर मुहूर्त सापडला; बीड अतुल सावे, गिरीश महाजन लातूर तर तानाजी सावंत उस्मानाबादचे पालकमंत्री. At last the moment was found; Beed Atul Save, Girish Mahajan Latur and Tanaji Sawant Osmanabad Guardian Minister

मुंबई — राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधी होत आला तरी पालकमंत्रीपदाची नियुक्ती करण्यात आली नव्हती .अखेर राज्य सरकारला मुहूर्त सापडला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. बीडच्या पालकमंत्री पदी अतुल सावे लातूरची गिरीश महाजन तसेच तानाजी सावंत यांच्यावर उस्मानाबादच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद देण्यात आले असून गिरीश महाजन यांची धुळे, लातूर, नांदेडवर बोळवण करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे –

राधाकृष्ण विखे पाटील – नगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार  – चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील  – पुणे,

विजयकुमार गावित  –  नंदुरबार,
गिरीश महाजन  – धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील  – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे            – नाशिक,
संजय राठोड       – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे         – सांगली,
संदिपान भुमरे      – छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत       – रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत.     – परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण.   – पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार        – हिंगोली,
दीपक केसरकर    – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे.       – जालना, बीड,
शंभूराज देसाई      – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा   – मुंबई उपनगर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button