पोलीस सतर्क:मुलं पळवणारी टोळी सक्रिय ही अफवा;अफवेचे व्हिडिओ शेअर केल्यास होणार कारवाई– पो.अ. ठाकूर. Police alert: There is a rumor that a gang of child abductors is active; Action will be taken if the video of the rumor is shared — Sp Thakur

बीड — जिल्ह्यात बऱ्याच दिवसापासून लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरवली जात आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने या अफवेची शहानिशा आणि सखोल चौकशी केली असुन ही फक्त अफवा असल्याचे खात्री झाली तसेच शाळा आणि महाविद्यालय परिसरात पोलीसांनी गस्त वाढवली आहे. पोलीस यंत्रणा रात्र न दिवस सतर्क असून जे सोशल मीडिया वर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत जुने किंवा दुसरीकडेच असल्याचे निदर्शनास आले असुन या व्हिडिओशी बीड चा कोणताही संबंध नसल्याचे निदर्शनास आले. असे व्हीडिओ विनाकारण व्हायरल करू नये जर कोणी जाणुन बुजुन अशी अफवा पसरवत असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी गावात .गल्लीत तसेच परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती समस्यास्पद हालचाली आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क करावा कोणीही त्या व्यक्तीस मारहाण करू नये आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये या बाबद काहीही संशयास्पद निदर्शनास आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांना ०२४४२ २२२३३३. ०२४४२ २२२६६६ या नंबरवर संपर्क साधावा तसेच ११२ हेल्पलाईन वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक बीड यांनी केले आहे.