आपला जिल्हा

गोविंदवाडी शिवारात सापडलेल्या नकोशीचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी स्विकारले पालकत्त्व!

बीडगेवराई तालुक्यातील गोविंदवाडी शिवारात सापडलेल्या समाजाला नकोशी झालेल्या नवजात शिवकन्येला ग्रामस्थ व प्रशासन यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल केल्यानंतर बाळाला अधिक पुढील उपचारासाठी काकुनाना मेमोरिअल हाॅस्पीटल मध्ये मध्ये दाखल करण्यात आले आहे, त्या ‘नकोशी’चे पालकत्व आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी स्वीकारल्याने एक संवेदनशील मनाचा नेता बीडच्या जनतेला पहावयास मिळला आहे.

आज शिवकन्येचे पालकत्व मी स्विकारले आहे. उपचारासह सर्व जबाबदारी मी घेतली आहे. बाळ सुखरूप असल्याची बातमी ही माझ्यासाठी सर्वात जास्त समाधानाची आहे आशी प्रतिक्रिया आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे.

गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी शिवारात स्त्री जातीचे नवजात अर्भक टाकण्यात आले असल्याचे समोर आले. रात्रीच्या सुमारास मुलीचा रडण्याचा आवाज परिसरातील नागरीकांनी ऐकल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा निर्दयी प्रकार कोणी केला हे अजून समजू शकले नाही. मात्र याची माहिती मिळताच गेवराईसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. सदरील नकोशीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी तिला तातडीने काकू-नाना मेमोरिअल हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. काकू-नाना मेमोरिअल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हे सदरील बालिकेवर उपचार करत असून तिचे पालकत्व स्विकारून पुढील उपचारासाठी जबाबदारी उचलली आहे. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या समवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, बालरोग तज्ञ डॉ.सचिन आंधळकर, काकू-नाना मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बालाजी जाधव, गटनेते फारूक पटेल, अशफाक इनामदार, भाऊसाहेब डावकर, बाबु जोगदंड, दिनेश मुंदडा, सय्यद बशीर, ज्ञानेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close