क्राईम

उभ्या स्कूल बसला मोटर सायकलची धडक :दोन ठार, एक जखमी. Motorcycle collides with stationary school bus: Two killed, one injured

केज — उभ्या असलेल्या स्कूल बसला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटार सायकलने पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कोरेगाव जवळ घडली.

शहरातील एका शाळेची स्कूल बस एम एच- 44 -9996 विद्यार्थ्याना सोडण्यासाठी बीड रोडवरून जात होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास बस कोरेगावजवळील थांब्यावर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी थांबली. याच वेळी भरधाव वेगात आलेली मोटार सायकल क्र.एम एच -13– बी जे 8574 बसच्या पाठीमागील बाजूला जोराने धडकली.या झालेल्या अपघातात दुचाकीवरील दिपक कल्याण पवार वय 20वर्ष, सुनील मधुकर शिंदे वय25 वर्ष,भागवत कल्याण पवार वय 22 वर्ष हे तिघेजण गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच डॉ विजयप्रकाश ठोंबरे, भगवान केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असताना दिपक पवार आणि सुनील शिंदे या दोघांचा मृत्यू झाला.तर भागवत कल्याण पवार यास डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्यामुळे लातूर येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button