विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेचा सिंहाचा वाटा — शिक्षणाधिकारी डॉ विक्रम सारूक. Lion’s share of National Service Scheme in formation of students — Education Officer Dr. Vikram Sarook

चौसाळा — राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान महत्वपूर्ण आहे. राष्ट्रहिताच्या अनेक योजनांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना उत्स्फूर्तपणे सहभागी असते असे प्रतिपादन बीडचे शिक्षणाधिकारी डॉ विक्रमजी सारुक यांनी केले.
ते कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. विलास भिल्लारे, कमविचे उपप्राचार्य प्रा. ढवळशंख सर, पदव्यूत्तर विभागाचे संचालक डॉ. काकासाहेब पोकळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधुन भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. सारूक म्हणाले की महाविद्यालयीन जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी संधी गेल्यावर संधी शोधण्याचा प्रयत्न करू नये, स्वतःसाठी जगण्याऐवजी राष्ट्रासाठी जगले पाहिजे. माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे आहे असे सांगून अनेक महापुरुषांच्या जीवनाचे दाखले त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषण करताना उपप्राचार्य डॉ. विलास भिल्लारे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी सकारात्मक ऊर्जा घ्यावी व आपल्या अंगी अनेक कौशल्ये विकसित करावीत. या प्रसंगी पदव्यूत्तर विभागाचे संचालक डॉ. काकासाहेब पोकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. चांगदेव शेळके यांनी केले. सुत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ.सोमनाथ लांडगे यांनी केले. तर आभार प्रा. सुधीर माने यांनी व्यक्त केले. या प्रसंगी पत्रकार अजमेर मणियार, विकास नाईकवाडे, प्रसाद देशमुख, पंडित जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. लालासाहेब घुमरे, डॉ.एस.बी. देशमुख, डॉ. अमर आल्दे , प्रा. गिराम मॅडम, डॉ. हिरवे, डॉ. वाणी, डॉ. गरबडे, प्रा. नामदेव कळसकर, प्रा. पवार मॅडम, प्रा. काशिद मॅडम, प्रा. नावेकर मॅडम ,शेख मुस्तफा, मिनाज सय्यद, राजू मुजावर, लांडगे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.