महाराष्ट्र

कोरोना संकट : ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णयआता पत्रकारांनाही मिळणार 50 लाखाचे विमा कवच

मुंबईसध्या राज्यात कोरोना विरोधातील विरुद्ध तीव्र झालेले असतानाच अत्यावश्यक सेवेत असणारे पत्रकार तितकीच मोलाची कामगिरी बजावत आहे. माहिती मिळवण्यासाठी पत्रकार जीवावर उदार होऊन काम करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे या काळात कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकारास 50 लाखाचे विमा कवच देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली ते माध्यमाशी संवाद साधत असताना या संदर्भात माहिती दिली‌

   डॉक्टर आणि पोलीसचं नाही तर पत्रकारही करोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवाने  जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवाने कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचे विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही, असे टोपे म्हणाले.

जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसंच करोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचे हे विमा कवच मिळणार आहे, असे  त्यांनी स्पष्ट केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close