कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती कडून महिलेचा विनयभंग. Woman molested by ex-chairman of Agricultural Produce Market Committee

केज — तालुक्यातील सादोळा येथील एक महिला शेतात आपल्या पतीकडे जात असताना एकाने त्या महिलेचा विनयभंग केला.दरम्यान आरोपी कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी सभापती व सादोळा सेवा सहकारी सोसायटीचा नवनियुक्त चेअरमन आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही सादोळा येथे आपल्या पती, मुले व सासू सासऱ्यासह शेती व मेंढपाळ व्यवसाय करून आपली उपजीविका करते. गावातीलच संभाजी बब्रुवान इंगळे यांच्या घरी म्हैशीच्या दुधाचा रतीब लावलेला आहे. दि. 21 सप्टें रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पिडीतेचा पती शेतातून मेंढ्या घरी घेऊन येणार असल्याने फिर्यादी महिला पतीच्या मदतीसाठी सादोळा ते भालगांव रोडने जात असताना गावातील संभाजी इंगळे याने मागून येवून कुठे चालली आहेस अशी विचारणा केली. यावेळी माझे पती शेतातुन मेंढ्या घेऊन येत आहेत म्हणून त्यांच्याकडे जात आहे, असे सांगितले. यानंतर संभाजी इंगळेने दुधाचे किती पैसे झाले असे विचारताच महिलेने मला घाई आहे. सकाळी घरी येऊन हिशोब करता येईल असे सांगितले. आणि ती महिला पुढे जाताच रस्ता अडवून तिला पकडत जवळ ओढले. महिला त्यास हिसका देऊन पुढे गेली असता पुन्हा तसेच केले.दरम्यान, महिला घाबरत आपल्या पतीकडे धावत गेली. आपल्या पतीस झालेला प्रकार सांगितला. महिला आणि पती दोघांनी युसूफवडगांव पोलिस ठाण्यात याबात तक्रार दिली. तक्रारीवरून इंगळे याच्यावर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.