डेमू रेल्वेचे डेमू मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार उद्घाटन. Demu Railway will be inaugurated by Demu Chief Minister

अर्धवट घराची कोणी वास्तुशांती करतं का ?
मध्य रेल्वेनेच रेल्वे डेमु सेवा असे पाॅम्पलेट प्रकाशीत केले त्या उद्धघाटनाचा रेल्वे कृती समीतीकडुन जाहीर निषेध
बीड — जिल्ह्यत उद्या न्यु आष्टी- अहमदनगर डेमु रेल्वे मार्गाचे उद्धघाटन डेमु मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे.ज्या रेल्वे मार्गाचे नियोजन होते ते परळी-बीड-अहमदनगर या रेल्वे मार्ग प्रस्तावीत होता त्यामध्ये कधीही न्यु आष्टी- अहमदनगर हा मार्ग कधीही त्याचा भाग होता हे साधा उल्लेख नाही फक्त काही नेत्याच्या हट्टापोटी या आर्धवट प्रकल्पाचे उद्धघाटन ठेवण्यात आले आहे त्याचा विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीती निषेध केला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये यापुर्वी परळीला रेल्वे होती. आत्तापर्यत बऱ्याच नेत्यांनी रेल्वेचे उद्धघाटन कधी बार्शी नाक्यावर तर कधी पालवन चौकात तर कधी चंपावती क्रिडा मंडळावर अशा असंख्य ठिकाणी उद्धघाटन केले आहेत.असेच वेड्यात काढुन रेल्वेच्या नावाखाली मतं खाऊन निवडणूकीपुरतं जनतेला वेड्यात काढले आहे.
अर्धवट घराचे बांधकाम करुन कोणी वास्तुशांती करतं का? असचं यापुर्वी सरकारने मोठे प्रकल्प तयार केले पण अर्धवट कामाच कधीच उद्घाटन केल गेल नाही .हा मार्ग अर्धवट केला आता नवा तर्क लावुन हा पुर्ण झालेला मार्ग देखील याचाच ऎक भाग असल्याचे भासवत मोठे उद्धघाटन करुन पक्षांना त्याचे क्रेडीट घेवून मिरवायचे आहे. हे कितपत योग्य आहे.हा प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पुर्ण करायचे निर्देश आसतांना देखील अजून भुसंपादन प्रक्रियाच शिल्लक आहे.फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन असले उद्धघाटनाचे उपद्व्याप करायचे.जर हे असेच करायचे ठरले तर परळी-बीड-अहमदनगर हा मार्ग 281 किमी आहे मग असले 200 वेळेस उद्धघाटनं करावे लागतील. सरकारने संमृध्दी मार्ग बनवला पण अर्धवट मार्गाचे उद्धघाटन कुठे केले मग त्याला वेगळा न्याय अन् बीड च्या रेल्वे प्रकल्पास वेगळा न्याय असे का ? असा प्रश्न विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीतीने उपस्थीत केला आहे.
असल्या डेमु रेल्वेचे उध्दघाटन मंत्री महोदयाने करु नये.रेल्वे डेमु सेवा असे पाॅम्पलेट मध्ये रेल्वेने प्रकाशीत केले आहे.असे करुन जनतेला फसवू नये. अर्धवट प्रकल्पाचे उद्धघाटन ठेवण्यात आले आहे. त्याचा विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीती निषेध करत आहे.अशा आशयाचे निवेदन विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीती बीड च्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना दिले असुन यावेळी समीती अध्यक्ष जयप्रकाश अघाव,उपाध्यक्ष अॅड.गणेश करांडे,सचिव संगमेश्वर आंधळकर,राजेश शिंदे,रुद्रा शिंद आदी उपस्थीत होते.