आपला जिल्हा

आ.संदिप क्षीरसागर आक्रमक होताच नाकारलेला कापुस जिनिंगने घेतला, नोंद नसलेल्या कापसाची नोंद घेवून खरेदी केली जाणार

बीडबीड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांच्या कापसाची नोंद करण्याच्या कामात चुकीच्या पद्धतीने नोंदी करून घोळ होत असल्याची बाब समोर आली आहे. शेतकर्‍यांच्या नोंदी न घेता मागच्या नोंदी पुढे करत शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याने आ.संंदिप भैय्या क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट बाजार समितीमध्ये जात कापुस उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न आक्रमक पद्धतीने मांडल्यानंतर आवमेळ असलेली बाजार समिती चांगलीच ताळ्यावर आली आहे.

बाजार समितीच्या बाहेर उभे असलेली सर्व वाहनातील कापुस खरेदी केली जाणार असून जिनिंग चालकांनी किरकोळ कारणावरून नाकारलेला कापुसही खरेदी केला जाणार असून नोंद नसलेल्या कापसाची नोंद रात्री उशिरा पर्यंत घेतली जाईल अशी ग्वाही बाजार समितीच्या सचिवांनी दिली आहे. यावेळी डीडीआर बडे, सांगुळे, बाजार समितीचे सचिव शिनगारे उपस्थित होते.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना कापुस विक्रीसाठी टोकन देवून कापुस खरेदी केंद्रावर पाठवले जाते. सहा हजार पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी कापुस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे. परंतू बाजार समितीकडून शेतकर्‍यांवर अन्याय करत या नोंदीमध्येच घोळ असल्याची बाब समोर आली आहे. शेतकर्‍यांच्या नोंदी मागे ठेवत व्यापार्‍यांचीच चलती बाजार समितीने केली असल्याची बाब उघड झाली आहे. अशा अनेक तक्रारी आ.संदिप क्षीरसागर यांच्या कानी पडल्यानंतर त्यांनी डीडीआर बडे यांना सोबत घेत थेट बाजार समिती गाठली. तेथील शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेत बाजार समितीचे सचिव व कर्मचारी यांना शेतकर्‍यांच्या समोर उभे केले. यावेळी नोंदीमध्ये घोळ झाला असून नियमा प्रमाणे कापुस खरेदीची वाहने कापुस खरेदी केंद्रावर गेली नसल्याची कबुली यावेळी या अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नी आ.संदिप भैय्या क्षीरसागर अधिकच आक्रमक झाले. हा गैरप्रकार लक्षात घेताच आक्रमक भूमिका घेवून कर्मचार्‍यांची कानउघडणी करत तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍याची रात्री उशिरापर्यंत नोंद करा, बाहेर उभी असलेली वाहने आत घेवून कापुस खरेदी केंद्रामार्फत त्याची खरेदी करा, एकाही शेतकर्‍यांवर अन्याय झाला तर गाठ माझ्याशी आहे अशा सक्त सूचना यावेळी त्यांनी बाजार समितीच्या अधिकार्‍यांना दिल्या.

‘त्या’ नाळवंडीच्या शेतकर्‍यांचा कापुस जिनिंगने घेतला
सहा दिवसापासून बाजार समितीच्या आवारात कापसाची वाहने घेवून शेतकरी उभे आहेत. तरी देखिल नोंदीचा नंबर येवून देखिल बाजार समितीकडून टोकन दिल्या जात नाही. उशिरा टोकन दिल्यानंतर जिनिंग चालक वजन काटा होवूनही कापुस घेण्यास तयार नसल्याने नााळवंडी येथील शेतकरी हवालदिल झाले होते. संबंधित जिनिंगवरील ग्रेडर शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घ्यायला तयार नव्हते. आ.संदिप भैय्यांनी या प्रश्नी लक्ष घालत त्या जिनिंगवरील ग्रेडरला बोलवून घेतले, कापुस नाकारण्याचे कारण विचारताच त्या शेतकर्‍यांचा घेत असल्याची कबुली ग्रेडरने दिली. आठ दिवसापासून ताटकळत असलेल्या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आ.संदिप भैय्यांच्या मदतीने समाधान दिसले आहे.
बाजार समितीच्या आवारातील सर्व वाहनांमधील कापुस घेतला जाणार

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर उभी असलेली वाहने तांत्रिक कारण पुढे करत बाजार समिती टोकन देण्यासाठी वाहनांना आत प्रवेश देत नव्हती. आ.संदिप क्षीरसागर यांनी शेतकर्‍यांची वाहने आहेत. पाऊस पडल्यास त्यांचा कापुस भिजल्या जाईल नुकसान होईल यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केल्यानंतर बाजार समितीने आठ-आठ दिवसापासून उभी असलेली सर्व वाहने आवारात घेवून त्या कापसाच्या नोंदी घेवून त्यांना टोकन देवून खरेदी केंद्रावर पाठवले जाईल असे सचिव शिनगारे यांनी सांगितले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close