ताज्या घडामोडी

आदर्श’, ‘नवगण’, ‘विनायक’, श्री. अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थांची होणार चौकशी. Adarsh’, ‘Navagan’, ‘Vinayak’, Shri. Anant Krishi Vikas Pratishthan educational institutions will be investigated

आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे दिले विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश

बीड —  जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण संस्था, श्री.अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत असलेल्या शाळा, महाविद्यालयामध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या शैक्षणिक संस्थांमध्ये वारंवार अनियमितता झाल्याचेही उघड झाले होते. प्राप्त तक्रारींवर पाऊले उचलत आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित विभागामार्फत या संस्थांकडे संबंधित विषयांची माहिती मागविली होती परंतु या संस्थांकडून, तब्बल २५ वेळा पत्रव्यवहार करून देखील आ.संदीप क्षीरसागर यांच्या एकही पत्राचे अनुपालन झाले नाही व कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला व विधानसभा उपाध्यक्षांनी या शैक्षणिक संस्थांची चौकशी होऊन मागविलेली माहिती सात दिवसांच्या आत पाठविण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
आदर्श शिक्षण संस्था-बीड, नवगण शिक्षण संस्था-नवगण राजुरी, विनायक युवक कल्याण संस्था- बीड व श्री.अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत जिल्हाभरात अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. मागील काही दिवसांपासून या संस्थांमध्ये मोठे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आ.संदीप क्षीरसागर यांना प्राप्त झाल्या होत्या यावर विधानसभा सदस्य या नात्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित संस्थांकडील विध्यार्थ्यांची सध्यस्थिती, प्राथमिक व माध्यमिक सर्व शाळेतील सन २०१० ते सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या मान्यतेचे निकष, शाळेवरील रिक्त, अतिरिक्त व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मान्यता असल्याबाबतची माहिती, शासन निर्णयाप्रमाणे मिळणारे शाळा मान्यतेपासूनचे विविध प्रकारचे अनुदान, शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेस प्राप्त साहित्य व अन्न पुरवठा वितरण व विनियोगाचा वर्षनिहाय तपशील, सन २०१० पासूनचा लेखा परीक्षण अहवाल, कोवीड-१९ कालावधीमधील शालेय पोषण आहार अंतर्गत प्राप्त साहित्याचे वितरण, संस्थेअंतर्गत असलेल्या आश्रम शाळा, कृषी महाविद्यालय, सैनिकी विद्यालय यांची तपशीलवार माहिती तसेच मागील काही दिवसांपूर्वी नवगण शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून एक महिन्याच्या अवैध पगार वसुली प्रकरणाची तपशीलवार माहिती, संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांच्या खासगी व घरगुती कामे करवून घेणे, शाळेतील शिक्षक व प्राध्यापकांना खासगी शिकवणीवर शिकविण्यासाठी परावृत्त करणे अशा प्रकारच्या तक्रारींसह विविध विषयांची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार करून मागविली होती. यासंदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून तब्बल २५ वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता परंतु एकही पत्रव्यवहाराचे अनुपालन न झाल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबंधित संस्थांची चौकशी करून आ.संदीप क्षीरसागर यांनी मागविलेली माहिती सात दिवसांच्या मुदतीत त्यांना पाठविण्यात यावी असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाचे सचिव व बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button