आपला जिल्हा

बीड : स्वॅब घेतल्यानंतर काही तासातच रुग्णाचा आयसोलेशन वार्ड मध्ये मृत्यू

बीडहृदयाचा व लिव्हरचा आजार असलेल्या एका 46 वर्षीय इसमास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी त्याचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोग्य विभागाला आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
बीड शहरातील एक व्यक्ती विविध आजाराने ग्रस्त असल्यामुळे व त्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी दाखल करण्यात आले. त्यात आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले. रात्रीच्या वेळी त्याचा स्वॅब घेण्यात आला. मात्र काही कालावधीतच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीस हृदयविकारा सोबतच लिव्हरचा  त्रास होता. या व्यक्तीस प्रवासाचा कुठलाही इतिहास नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधन कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे अहवाल रात्री उशिरा प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले. बुधवारी जिल्ह्यातून 66 रुग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close