आपला जिल्हा

प्रशासनाची बुद्धी झाली गंदी, पात्र उमेदवारांना कधी मिळणार संधी: तलाठी परीक्षेचा निकाल लागून झाले आठ महिने!

बीडयेथील जिल्हाधिकारी  आस्थापनेवर तलाठ्यांच्या ६८ जागा रिक्त आहेत, १० महिन्यांपूर्वी यातील ६६ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली, ८ महिन्यापूर्वी त्याचा निकालही लागला, मात्र अद्यापही या जागांवर पात्र व्यक्तींना नियुक्त्याच देण्यात आलेल्या नाहीत. मागील ८ महिन्यांपासून उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचा आणि जे येत नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा बोलावून ‘ संधीवर संधी ‘ देण्याचा खेळ जिल्हा प्रशासन खेळत आहे आणि यात ज्यांनी सारे सोपस्कार पार पडले आहेत त्यांचे मात्र हाल होत असून विद्यमान तलाठ्यांवर देखील कामाचा तान वाढलेला आहेच.

बीड जिल्हा आस्थापनेवरील तलाठ्यांच्या रिक्त जागांसाठी २०१९ च्या जुलै महिन्यात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. हजारो उमेदवारांनी दोन अर्ज भरल्याने २ जुलै ते २६ जुलै इतका कालावधी परीक्षेसाठी गेला. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन असली तरी निकालासाठी दोन महिने लागले. जिल्हा प्रशासनाने १८ सप्टेंबरला परीक्षेचा निकाल जाहीर झाला . आता तरी आपल्याला नियुक्त्या मिळतील असे यातील पात्र उमेदवारांना वाटत होते. मात्र निकाल लागून देखील ८ म्हणजे उलटले असले तरी अद्याप या भरतीतील नियुक्त्याच देण्यात आलेल्या नाहीत.
निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकास पाच या पद्धतीने पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले. यातील ज्यांना खरेच गरज होती, ते बिचारे धावत आले. त्यांनी कागदपत्रे दिली. मात्र बोलावण्यात आलेल्यांपैकी अनेकजण इकडे फिरकलेच नाहीत. खरेतर अशावेळी जे आले त्यांच्यातूनच नुईवाद यादी जाहीर करून नियुक्त्या देणे अपेक्षित होते. राज्यभर  घडतेही असेच. पण बीडच्या जिल्हा प्रशासनाला जे आले नाहीत, त्यांची भारीच काळजी आहे. जे लोक येतच नाहीत त्यांना संधीवर संधी दिली जात आहे. असा संधी देण्याचा खेळ आतापर्यंत अनेकदा झाला आहे. यातील कोणी इतरत्र नोकरीस आहेत, कोणाला रुजू  व्हायची इच्छा नाही , पण प्रशासन मात्र त्यांची काळजी सोडत नाही . यातून ज्यांना खरेच गरज आहे, जे पात्र आहेत, ज्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे त्यांच्याही नियुक्त्या रखडल्या आहेत.
खरेतर परीक्षा झाली , पात्र उमेदवारांपैकी कोणी वेळेवर आले नाही, तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची पद्धत आहे . मात्र राज्याचे धोरण काहीही असले तरी बीडचे सारेच वेगळे असते. तलाठी भरतीतही तेच होत आहे. जे लोक वेळेवर येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी प्रशासन आग्रही का आहे याचे उत्तर मात्र मिळायला तयार नाही. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close