बेलेश्वर मंदिरात चोरी,पंचधातुच्या मुकुटासह चांदीची पिंडीवरील शेषनागाची मुर्ती चोरीला. Stolen in Beleshwar temple, panchadhatu crown, silver idol of Seshnaga on pindi stolen

बीड — तालुक्यातील बेलेश्वर संस्थान मंदिरात चोरी झाली असून पंचधातूच्या मुकुटासह चांदीची पिंडीवरील शेषनागाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार रोजी सकाळी ५ वा बेलेश्वर संस्थानचे तुकाराम महाराज भारती नित्यनेमाने पुजेसाठी मंदिरात गेले असता गाभाऱ्याचे कुलुप तुटलेले व मंदिराचे दार सताड उघडे असल्याचे दिसले. त्याठिकाणी निरीक्षण केल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरील पंचधातुचा मुकुट व पिंडीवर मांडण्याची चांदीची शेषनागाची मुर्ती चोरीला गेल्याचे आढळून आले.
यापुर्वीही बेलेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरण्याचे प्रकार २-३ वेळा घडलेल्या आहेत परंतु पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्यात मुर्तीची चोरीची घटना घडली असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन चोरीच्या घटनेचा शोध घ्यावा अशी मागणी भक्त वर्गातून जोर धरू लागली आहे.