ताज्या घडामोडी

हिंगणीकरांचा मांजरा नदीतून जिवघेणा प्रवास; विद्यार्थ्यांचं शिक्षण अवघड तर उपचारा अभावी जीव धोक्यात! Hinganikar’s fatal journey across the Manjra river; Education of students is difficult and life is in danger due to lack of treatment

मांजरा नदीवर पूल करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थ्यांना शिक्षण अवघड तर उपचारा अभावी जीव धोक्यात. Villagers demand bridge over Manjra River; Education is difficult for students and life is in danger due to lack of treatment

विद्यार्थिनी नदी ओलांडावी लागते म्हणून शिक्षणापासून वंचित
ग्रामस्थांचे प्रशासनासह लोकप्रतिनिधींना साकडे; पूलासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

बीड — तालुक्यातील हिंगणी खुर्द गावाजवळून वाहत असलेल्या मांजरा नदीवर पूल नसल्यामुळे आंधळे वस्ती व मुंडे वस्तीवर राहणाऱ्या लोकांचा पावसाळ्याचे चार महिने जगाशी संपर्क तुटतो विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी जीवावर उदार होऊन नदीतून प्रवास करावा लागतो. आरोग्य सुविधा देखील उपलब्ध होत नाही. त्यामुळे मांजरा नदीवर पूल उभारण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

हिंगणी खुर्द मधील शेतकऱ्यांची जमीन उस्मानाबाद जिल्ह्यात येते मांजरा नदी ही या गावच्या अगदी जवळून वाहते.बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या या नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते. शेतात जायचे म्हटले तर वाहत्या मांजरा नदीतून जीवावर उदार होऊन कसे जायचे असा प्रश्न नेहमीच सहा महिने भेडसावतो. सुरक्षितच जायचे ठरवले तर पंधरा किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. नदीच्या पलीकडे मुंडे वस्ती व आंधळे वस्ती या ठिकाणी जवळपास सव्वाशे ते दीडशे कुटुंब रहात आहे. या वस्तीवरील विद्यार्थ्यांना हिंगणी खुर्द मधील शाळा जवळ आहे. मात्र मांजरा नदी ओलांडायची कशी असा प्रश्न नेहमीच भेडसावतो. शिक्षण घ्यायचं तर जीवाची परवा न करता घ्याव लागतं. विद्यार्थी मानवी साखळी तयार करून पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत शाळेत येतात. विद्यार्थी मुलांचं ठीक आहे नदीच्या पाण्यात अंडर पॅन्ट वर नदी पार करणं जमतं पण मुलींचं काय? नदीच्या पाण्यात भिजलेले कपडे मुलींना दिवसभर अंगावरच शाळेत वाळवावे लागतात. यातूनच मग मुलींना पालक शाळेत पाठवण्यास नकारही देतात इच्छा असून मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही विद्यार्थ्यांची रडकथा दरवर्षीचीच आहे. सोबतच या वस्तीवर राहणाऱ्या लोकांना वेळेवर आरोग्य सुविधा देखील उपलब्ध होत नाही. एखादी व्यक्ती आजारी पडलीच तर झोळी करून हिंगणी खुर्द गावात चालत नदीच्या पाण्यातून वाट काढत घेऊन यावे लागते.त्यानंतरच त्यांना उपचार घेण्यासाठी रुग्णालयाची वाट मोकळी होते. पण मध्यंतरी चा प्रवास हा नरक यातना भोगायला लावणार आहे. केवळ मांजरा नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर शेतीची काम करता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. पर्यायाने उत्पादनात घट आल्यामुळे खायचे वांदे निर्माण होतात. त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी ऊस तोडी सारख्या कामाला जावे लागते. त्यामुळे मांजरा नदीवर पूल उभारण्यात यावा यासाठी आता हिंगणीकर आक्रमक होऊ लागले आहेत. प्रशासनाकडे अर्ज विनंत्या करू लागले आहेत.मात्र याचा फायदा झालाच नाही तर मोठे आंदोलन उभा करण्याची तयारी ग्रामस्थ करू लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button