लाचखोर सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात. Bribery public prosecutor in ACB’s net

धारूर — निकालाची प्रत देण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला सहाय्यक सरकारी वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैसे स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना आज धारूर न्यायालयात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा लांब ( वायबसे ) यांनी तक्रारदाराकडे निकालाची प्रत देण्यासाठी दिड हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचे संदर्भात पडताळणी करण्यात आली. त्यानंतर धारूर न्यायालय आवारात सापळा लावण्यात आला.सदर रक्कम तक्रारदाराकडून स्विकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले . या प्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे . हि कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रविंद्र परदेशी व त्यांच्या पथकाने केली .