आपला जिल्हा

जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच जनतेला संभ्रमात टाकलय ,आता आपलं असं झालंय;ज्ञान सांगे लोकाला शेंबुड आपल्या नाकाला

एक रुग्ण बीड तर दुसरा गेवराई तालुक्यातील

बीडबीड जिल्ह्यात आज सापडलेले दोन कोरोना रुग्णांपैकी एक जण बीड तालुक्यातील बेलापूरी येथील असून दुसरा रुग्ण गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे सापडला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्या गेलेल्या सुरुवातीच्या माहितीत बालेपीर, व बीड तालुक्यातील सिरसदेवी असा चुकीचा उल्लेख झाला होता.

बीडच्या आरोग्य विभागाने सुरुवातीला दिलेल्या माहितीत एक रुग्ण बीड शहरातील बालेपीर भागातील असून दुसरा रुग्ण बीड तालुक्यातील सिरस देवी येथील असल्याचे म्हटले होते. मात्र ज्या 32 वर्षीय महिलेचा पॉझिटिव रिपोर्ट आला ही महिला बालेपीर भागातील नसून बीड तालुक्यातील बेलापुरी येथील असल्याचे तसेच दुसरा 26 वर्षीय रुग्ण गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील असल्याची माहिती दिली.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आठ दिवसांपूर्वीच विविध माध्यमातून रुग्ण संख्येत संदर्भात दिले जाणारी आकडेवारी संभ्रमात टाकणारी असल्यामुळे जोपर्यंत आमच्याकडून अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणीही रुग्ण सापडल्याची बातमी माध्यमा मार्फत देऊ नये असे सांगितले होते. त्यानंतर अनेक माध्यमांनी आपल्या सोर्स मार्फत माहिती मिळत असली तरी माहिती कार्यालयातून माहिती दिली गेल्यानंतरच बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र कोरोना संकटाच्या काळात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रशासकीय यंत्रणा किती संभ्रमावस्थेत आहे हे आजच्या त्यांच्या दिल्या गेलेल्या सुरुवातीच्या माहितीवरून सिद्ध झाले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्या गेलेल्या चुकीच्या माहितीमुळे जनतेची दिशाभूल झाली असून काही काळ त्यामुळे खळबळ माजली गेली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close