ताज्या घडामोडी

आ. क्षीरसागरांची वचनपूर्ती; सत्तर कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज उद्घाटन. come Fulfillment of the Promise of the mla kshirsagar Inauguration of development works worth Rs.70 crores today

बीड — जनतेला दिलेल्या वचनाची पूर्ती करत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या 70 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात येत आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी नेहमीच विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना तळमळीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले आहे. सोबतच जनतेला दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्ती करत असल्याचं दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून बीड शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,किंमत ५.८८ कोटी,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल ( करपरा नदीपुल ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे . ६.८१ कोटी ,राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.६.८१ कोटी रुपये, बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ३.४० कोटी, कासट ते शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ५.०९ कोटी, मसरत नगर ते नेत्रधाम ते सावरकर चौक सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ७.७३ कोटी,पेठ बीड पोलीस स्टेशन ते इदगाह ते नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ५ कोटी,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे३.०६ कोटी ,बार्शी रोड , मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड ( लेंडी नाला ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे९.०९ कोटी,अंकुश नगर ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,३.६७ कोटी, शितल वस्त्र भंडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजुचे रस्ते सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ५.१० कोटी अशा एकूण सत्तर कोटी रुपयांच्या विकास कामाचा उद्घाटन समारंभ आज संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते होत आहे.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button