ताज्या घडामोडी
“सकाळ “चे पत्रकार दत्ता देशमुख यांना डॉ.ना.भी. परुळेकर पुरस्कार Datta Deshmukh, journalist of “Sakal”, Dr. N.B. Parulekar Award Announcement

बीड — येथील सकाळचे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांना ‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. ना. भी. परुळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला.मंगळवारी (दि. 20) पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे द प्रिंटचे संस्थापक संपादक शेखर गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
स्वातंत्रसैनिक व जेष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांच्या पुढाकाराने 40 वर्षांहून अधिक काळापासून दरवर्षी डॉ.ना. भी. परुळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नावाने हा सकाळ मधील सर्वोच्च व मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वीच 2018 मध्ये दत्ता देशमुख यांचा या पुरस्काराने सन्मान झाला होता. दरम्यान, जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्त्या प्रकरणातील लिखाण व मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत व सरकारी नोकरी देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होत नसल्याचा विषय दत्ता देशमुख यांनी सातत्याने तीन वर्षे लावून धरला. परिणामी महाराष्ट्रातील 39 कुटुंबियांना 10 लाख रुपयांची सरकारी मदत व या कुटुंबातील एकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी मिळाली. या वृत्तांबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.दरम्यान, दत्ता देशमुख यांचा यापूर्वीही कै. मोहनलाल बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार, केज तालुका आदर्श पत्रकार समितीचा पुरस्कार अशा अशा मानाच्या पुरस्काराने गौरव झाला आहे.