आपला जिल्हा

” सह्याद्री माझा “चा दणका : हिंद नगरमधील अवैध दारूविक्री दुकानावर दारूबंदी विभागाचा छापा

परळीयेथील हिंद नगर भागात अवैध दारू विक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली होती. 30 मे रोजी सह्याद्री माझा ने यासंदर्भात वृत्त छापताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने याठिकाणी छापा मारून एक्टिवा गाडी सहित 58 हजार रुपयाची दारू जप्त केली आहे.

हिंद नगर भागातील नागरिकांनी यापूर्वी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत प्रशासनास दारूविक्री विरोधात कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर लॉक डाऊन चे नियम काही प्रमाणात शिथिल होताच पुन्हा या अवैध दारू विक्रीने पुन्हा तोंड वर काढले होते. एकीकडे कोरोना मुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे तर दुसरीकडे बेवड्यांनी येऊन नागरिकांच्या दारात धिंगाणा घालायचा असे सत्र सुरू झाले होते. कोरोनाच्या भीतीने या बेवड्यांना हात लावायची हिंमत सुद्धा कुणाची होत नव्हती. कोरोना व बेवडे यांच्या कचाट्यात येथील नागरिक सापडले होते. यासंदर्भातील वृत्त सह्याद्री माझा ने 30 जून रोजी “हिंद नगर ” भागात खुलेआम अवैद्य दारू विक्री या शीर्षकाखाली प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ कारवाई करत याठिकाणी छापा मारून 28 हजार 800 रुपये किमतीचे देशी दारूचे चार बॉक्स जप्त केले दारू वाहतुकीसाठी वापरत असलेली एक्टिवा गाडी सुद्धा जप्त केली. याप्रकरणी सलीम गफार पठाण वय 31 वर्ष यास ताब्यात घेतले असून ही कारवाई अमजद खान पठाण भागवत पाटील ,शेख सादिक, राम डुकरे यांनी केली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close