ताज्या घडामोडी

एका जवानाच्या बलिदाना नंतर डॉ.फपाळ यांचा मृतदेह सापडला. Dr. Phapal’s body was found after the sacrifice of a jawan

माजलगाव — येथील धरणात पोहण्यासाठी गेलेले डॉ. दत्तात्रय फपाळ हे बुडाले होते. त्यांच्या मृतदेहाचा दोन दिवसांपासून शोध सुरू होता. दरम्यान शोध कार्यासाठी आलेल्या एका जवानाचा ही मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. तब्बल 32 तासाच्या अथक परिश्रमानंतर 5 च्या सुमारास डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडला.

माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेले तेलगाव येथील अजिंक्य हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ वय ४५ वर्ष रा. बेलोरा ता.माजलगाव हे रविवारी दि.१८ सकाळी माजलगाव धरणात बुडाले. त्यांच्या मृतदेहाचा बीड व परळी येथील एनडीआरएफ चे पथक शोध घेत होते. त्यांना शोध लावण्यात यश न आल्याने आज सकाळी कोल्हापूर येथील एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले. त्यांनी ही शोध मोहिम सुरू केली. परंतु या पथकातील राजशेखर प्रकाश मोरे या जवानाचा शोध कार्या दरम्यान मृत्यू झाला. अनेक प्रयत्न करुनही डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडत नसल्याने शेवटी मासेमारी करणाऱ्या स्थानिकांनी त्यांच्याकडील गळ पाण्यात टाकून शोध सुरू केला. याच गळाला मृतदेह लागलं व त्यांना बाहेर काढण्यात आले. डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडल्याने 32 तासा नंतर शोध कार्यात यश आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button