विवाहितेला पेटवले; सहा महिन्यापूर्वी झाला होता आंतरजातीय विवाह. burned the married; An inter-caste marriage was done six months ago

वडवणी — सहा महिन्यापूर्वी अंतरजातीय विवाह केलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेला नवऱ्याने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना वडवणी शहरातील साळींबा रोडवर घडली आहे . गंभीर भाजलेल्या विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी तीचा जवाब नोंदवला आहे . त्यानंतर नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख अंजुम शेख युसुब वय 22 वर्षे , रा . माजलगाव हीचा गेल्या काही वर्षापूर्वी औरंगाबाद येथील तरुणाशी विवाह झाला होता . त्यांना एक मुलगा आहे . सुखी संसार सुरु असतांना अंजुमच्या पतीचे अपघातात निधन झाले . तेव्हापासून अंजुम ही आपल्या आई वडिलासोबत माजलगावात राहत होती . त्यानंतर तीचे आई- वडील हे उपळी ता.वडवणी येथील बळीराम राजाभाऊ इचके यांच्या सोबत उसतोडणीला जात होते.अंजुमही त्यांच्या सोबत उसतोडणीला जावू लागली. त्या दरम्यान अंजुम आणि बळीराम इचके यांची ओळख झाली . अन् ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले . गेल्या सहा महिन्यापूर्वी त्यांनी अंतरजातीय विवाह केला . अन् ते वडवणी शहरातील साळींबा रोड येथे किरायाच्या घरात राहू लागले.बळीराम इचके याचही यापूर्वी लग्न झालेले आहे . त्याला दोन मुले आहेत.15 सप्टेंबर रोजी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला अन् इचके याने अंजुम हीच्या अंगावर डिझेल टाकून पेटून दिले . गंभीर भाजलेल्या अंजूमवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडवणी पोलिसांनी तीचा जवाब नोंदवून तिच्या पतिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Hurrah! In the end I got a web site from where I be able
to truly get valuable facts regarding my study and knowledge.
Ahaa, its fastidious discussion concerning this paragraph at this place at this website,
I have read all that, so now me also commenting at this place.