आरोग्य व शिक्षण

🌹💐 प्रा. सर्जेराव बोराडे यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्रदान Prof. Sarjerao Borade awarded PhD by Mumbai University💐🌹

बीड- तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील मूळ रहिवासी व मुंबई येथे कार्यरत असलेले प्रा. सर्जेराव बोराडे यांना मुंबई विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.

याबाबत माहिती अशी आहे की, मूळचे हिंगणी येथील रहिवासी असलेले डॉक्टर सर्जेराव बोराडे यांनी समाजशास्त्र विषयातून प्रसार ‘माध्यमे आणि सीमांतिक समुदाय संबंधी जातीय अत्याचार पीडितांचा आज समाजशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर पीएचडी प्रबंध मुंबई विद्यापीठाच्या कमिटीसमोर सोमवारी सादर केला होता. त्यानंतर त्यांना विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. पीएचडी साठी डॉ. बालाजी केंद्रे समाजशास्त्र प्रमुख, मुंबई विद्यापीठ यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. बोराडे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button