क्रीडा व मनोरंजन

गेवराईत होणार गरबा-दांडियाचे वर्कशॉप तीन दिवस होणार दांडिया उत्सव.Workshop of Garba-Dandiya to be held in Gevrai Three days Dandiya Utsav will be held

गेवराई —  नवरात्री उत्सवानिमित्त महिलांचा आंनद द्विगुणित करण्यासाठी “आर्ट ऑफ फन” च्या वतीने ‘चार दिवसीय गरबा-दांडिया वर्कशॉप आणि तीन दिवसीय गरबा-दांडिया नाईट्स चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त गुजरात राज्यातील विविध भागात मोठ्या उत्साहात खेळला जाणारा गरबा-दांडिया हा कलाप्रकार महाराष्ट्रभर खेळला जातो. महिलांच्या विविध कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देत तथा विविध बक्षिसांच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यासाठी, आर्ट ऑफ फन च्या वतीने शिका – खेळून बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली जात आहे. 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 04 ते 06 या वेळेमध्ये छत्रपती सांस्कृतिक सभागृह,नगर परिषद कॉम्प्लेक्स शिवाजी चौक गेवराई येथे “तीन दिवसीय गरबा- दांडिया वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले आहे. दि.01 ते 03 ऑक्टोबर 2022 रोजी ठीक सायंकाळी 05 ते 07 या वेळेत भव्य गरबा-दांडिया स्पर्धा तथा डीजे नाईट्स चे आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने ग्रुप गरबा-दांडिया स्पर्धा, वयक्तिक गरबा-दांडिया स्पर्धा, व फॅशन शो स्पर्धा चे आयोजन
रत्नमाला (नानी) मोटे ,
शितलताई दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सर्वप्रथम येणाऱ्या स्पर्धकाला सोन्याची सुवर्ण नथ प्रदान करण्यात येणार आहे. विविध आकर्षक बक्षिस व सेल्फी पॉईंट ची उभारणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून, बक्षिसांचे मानकरी होण्यासाठी शहरातील महिलांनी संपर्क क्रमांकावर नोंदणी करून उपस्थित राहावे असे आवाहन,
रत्नमाला मोटे,शितल दाभाडे व आर्ट ऑफ फन टीम चे रोहित पुराणिक (9325212199) शिवकुमार सोनवणे (7021320970) दिपक गिरी (8177924756) विवेक शर्मा(9834768620) यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button