देश विदेश

पीएम केअर फंडमध्ये आलेल्या देणगीची माहिती देण्यास प्रधानमंत्री कार्यालयाचा नकार

नवी दिल्लीकोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान नागरिक सहाय्यता आणि आपात्कालीन फंड अर्थात पीएम-केअर्स फंडाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. तसेच देशातील पीडित लोकांच्या मदतीसाठी लोकांनी पैसे दान करावे, असे आवाहन त्यांनी केले होते. देशातील नागरिकांनी देखील या पीएम केअर फंडला भरभरुन मदत देखील केली आहे. पण आता या फंडमध्ये जमा झालेल्या देगणीबाबतची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिल्याचे वृत्त आहे.

श्रीहर्ष कंदकुरी नावाच्या व्यक्तीने आरटीआयला 1 एप्रिल रोजी विनंती केली होती की फंडशी संबंधित ट्रस्टची कागदपत्रे तसेच फंडला चालवण्यासाठी दिलेले सरकारी आदेश, अधिसुचना याबाबत माहिती देण्यात यावी. त्यांना पीएमओकडून तब्बल 30 दिवसांनतर उत्तर मिळाले. माहिती अधिकार कायदा 200, च्या कलम 2 (ह) अंतर्गत पीएम केअर फंड हा सार्वजनिक अधिकार नाही. असे असले तरी पीएम केअर फंडाशी संबंधित महत्वाची माहिती त्याच्या वेबसाइट pmcares.gov.in वर जाऊन पाहु शकता, असे पीएमओने म्हटले आहे.

दरम्यान, विरोधकांनी अनेक वर्षांपासून सरकार पीएम रिलीफ फंड तसेच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असा सवाल विचारला होता. पीएम केअरअर फंडामध्ये जमा झालेली रक्कम चे कॅगला सुधा ऑडिट करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात आले होते.तसेच पीएम केअर फंडासाठी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी मदत मागताना फेक वेबसाईट दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close