आरोग्य व शिक्षण

शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांचे करण्यात आले फेर सर्वेक्षण.A re-survey of out-of-school children was conducted by the Education Department

आत जिल्ह्यात फक्त वीस मुलं शाळाबाह्य
कधीच शाळेत न गेलेले २० तर अनियमित शाळेत जाणारे १४३ बालके आढळून आले आहेत.
डॉ.गणेश ढवळे यांनी केली होती फेर सर्वेक्षणाची मागणी तर मनोज जाधव यांनी उपस्थित केले होते सर्वेक्षणावर प्रश्न

बीड — शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले . यामध्ये जिल्ह्यात ३ ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण ५ जुलै ते २० जुलै दरम्यान करण्यात आले . त्यात चक्क दहा बालक शाळाबाह्य आढळून आली तर अनियमित उपस्थिती असलेले केवळ २८ बालके आढळून आले आहेत. ही सर्व आकडेवारी पाहता हे सर्वेक्षण कसे झाले असेल या बाबत आशचर्य व्यक्त होत होते तर हे सर्वेक्षण पुन्हा फक्त कागदोपत्री झाले असून ते पुन्हा करण्यात यावे अशी मागणी समजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे आणि शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली होती.त्यावर शिक्षण विभगाने पुन्हा सर्वेक्षण केले असून आता या सर्वेक्षणात वीस बालके शाळा बाह्य आढळून आली आहेत.

बीड जिल्हा हा प्रमुख्याने ऊस तोड मजुरांचा जिल्हा आहे . जिल्ह्यात लाखो ऊसतोड मजूर स्थलांतर करतात यात त्यांच्या मुलांची देखील फरपट होते . परिणामी ते शिक्षणा पासून वंचित राहतात .पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या आणि इतर मजुरांचे होणारे स्थलांतर , कौटुंबिक परिस्थिती , पालकांचे अज्ञान , शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे . त्या मुळे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण हे कटाक्षाने करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभागाने जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात फक्त दहा मुले शाळाबाह्य आढळली होती. याची फेर तपासणी व्हावी या साठी बला हक्क संरक्षण संघाचे डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुट पॉलिश आंदोलन करून मागणी केली होती. तर आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी देखील या सर्वेक्षणा वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यावर शिक्षण विभगाने पुन्हा सर्वेक्षण केले असून आता दहा ऐवजी वीस बालके शाळा बाह्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

वर्षात झाले तीन वेळा सर्वेक्षण

चालू वर्षात हे शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण शिक्षण संचालक यांच्या सूचनेनुसार प्रथम १ मार्च ते १० मार्च २०२२ दरम्यान करण्यात आले होते. त्या वेळी तर चक्क एकही बालके शाळा बाह्य आढळून आले न्हवते तर अनियमित उपस्थिती असलेले १७७ बालके आढळून आले होते. दुसरे सर्वेक्षण ५ जुलै ते २० जुलै दरम्यान करण्यात आले . त्यात फक्त १० बालक शाळाबाह्य आढळून आली तर अनियमित उपस्थिती असलेले केवळ २८ बालके आढळून आले आहेत. तर फेर सर्वेक्षण करण्याची मागणी झाल्या नंतर आता २० बालक शाळाबाह्य आढळून आली तर अनियमित उपस्थिती असलेले १४३ बालके आढळले आहेत.

सर्वेक्षणामध्ये वीस बालक शाळाबाह्य आढळले संख्या खालील प्रमाणे

तालुके                 मुले                 मुली
अंबाजोगाई.        ००.                  ०३

आष्टी                  ०१.                  ०९

बीड.                  ०४.                  ०२

धारुर                  ००                    ००
गेवराई.                ००.                   ००
केज                    ०१                     ००
माजलगांव           ००                     ००
परळी                  ००                     ००
पाटोदा                 ००                   ००
शिरुर                  ००                  ००

वडवणी                ००               ००

एकूण                 ०६                 १४ २०

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button